S M L

2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसची महाआघाडी?

Samruddha Bhambure | Updated On: Mar 17, 2017 12:56 PM IST

2019च्या लोकसभा  निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसची महाआघाडी?

17 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये 2019 साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत, असं सूत्रांकडून समजतंय.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाही उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट थोपवणं अशक्य झाल्याने काँग्रेस आता बॅकफुटवर आली आहे. त्यामुळे आगामी 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे आव्हान परतवून लावण्यासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधून महाआघाडी करण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या महाआघाडीला प्रादेशिक पक्ष कसे प्रतिसाद देतात याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

पण यात अनेक अडथळे येणार हे निश्चित. पहिला मुद्दा सपा आणि बसपाचं कसं पटणार. हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधून विस्तव जात नाही. मायावती आणि मुलायम यांचे संबंध नेहमीच ताणलेले राहिले. पण आता अखिलेश यांच्या उदयामुळे परिस्थिती बदलू शकेल का, ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close