कोण होणार यूपीचा मुख्यमंत्री ?, नाव मात्र गुलदस्त्यात

कोण होणार यूपीचा मुख्यमंत्री ?, नाव मात्र गुलदस्त्यात

  • Share this:

up_cm_416 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये 'कौन बनेगा मुख्यमंत्री?' हा सस्पेन्स कायम आहे. याआधी भाजपने नरेंद्र मोदींच्याच चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवली. पण आता मात्र सगळ्या राजकीय समीकरणांचा विचार करून भाजपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठं यश मिळालं पण या दोन्ही राज्यांत भाजपने अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही निश्चित केलेला नाही. उत्तराखंडमध्ये 18 तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये भाजपला कसलीच घाई नाहीये. राज्यातल्या आमदारांचं मत जाणून घेऊन पर्यवेक्षक व्यंकय्या नायडू आणि भूपेंद्र यादव अमित शहांना रिपोर्ट देतील आणि नंतर मुख्यमंत्री घोषित होईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाचं नाव मोदी आणि अमित शहा यांनी आधीच निश्चित केलंय पण हे नाव थोपवून धरण्यात आलंय. यासाठीच निकाल लागल्यानंतर दोनदा अमित शहा मुंबईत येऊन संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांना भेटून गेले.

राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री करावं, अशी संघाची इच्छा आहे पण मोदी-अमित शाहांनी आपल्या पसंतीच्या नावावर संघाला राजी करण्यात यश मिळवलंय. भाजपाच्या उत्तर प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण भाजप हे नाव जाहीर करण्याचं टाळतंय.

याक्षणी राजनाथ सिंह, केशव प्रसाद मौर्य,योगी आदित्यनाथ,दिनेश शर्मा,कलराज मिश्र यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण मोदी 'आऊट ऑफ बॉक्स' विचार करून धक्का तंत्र देण्यात माहीर असल्याने सगळेच इच्छुक देव पाण्यात ठेऊन बसलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 16, 2017, 11:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading