S M L

पंजाबमध्ये काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग मुख्यमंत्रिपदी, सिद्धुना उपमुख्यमंत्रिपद नाहीच !

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2017 04:26 PM IST

पंजाबमध्ये काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग मुख्यमंत्रिपदी, सिद्धुना उपमुख्यमंत्रिपद नाहीच !

16 मार्च :  पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून  कॅप्टन अमरिंदरसिंग यांना राज्यपाल व्ही. पी. सिंह बदनोर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे पंजाबमध्ये अखेर काँग्रेसचं सरकार विराजमान झालं आहेत.

विशेष म्हणजे क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धुला उपमुख्ममंत्रीपद देण्यात आलेलं नाही. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदावर समाधान मानावं लागलंय.

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी अमरिंदर सिंह यांचे नाव निश्चित मानले जात होते. अखेर आज अमरिंदर सिंह यांचा शपथविधी पार पडला. अमरिंदरसिंह यांच्यासोबत 9 सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, या शपथविधी समारंभाला राहुल गांधीही हजर आहेत. गोवा, मणिपूरमध्ये काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 01:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close