S M L

गोव्यात मनोहर पर्रीकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Samruddha Bhambure | Updated On: Mar 16, 2017 01:58 PM IST

गोव्यात मनोहर पर्रीकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

16 मार्च :  गोवा विधानसभा निवडणुकीत कमी जागा मिळविल्यानंतरही भाजपने मॅजिक फिगर गाठत सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेलं बहुमत सिद्ध करुन दाखवलं आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोवा विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला आणि काँग्रेससह सर्व विरोधकांची बोलती बंद केली.

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 17, भाजपला 13, मगोपला 3 आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला  3 जागा मिळाल्या होत्या.

बहुमत सिद्ध करण्यासाठी पर्रिकरांना  एकून 21 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. त्यामुळे हा  जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला 8 आमदारांचा पाठिंब्याची गरज होती तर काँग्रेसला फक्त 4 आमदारांचा पाठिंबा हवा होता. मात्र, असं असलं तरी भाजपने आपली चाणक्यनिती वापरत मॅजिक फिगर गाठलं आहे. बहुमत चाचणीत 22 आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला तर 16 आमदारांनी विरोध केला. एक आमदार यावेळी अनुपस्थित होते.

दरम्यान, गोवा विधानसभेत भाजपने 13 जागा मिळवल्या होत्या तसेच आपल्याला इतरांचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्षेप घेत सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. काँग्रेसने सर्वाधिक जागा  17 जिंकूनही सत्ता स्थापण्याचा दावा केला नाही, याचा आधार घेत राज्यपालांनी पर्रिकर यांना सत्ता स्थापण्यास सांगितले होते. सुप्रिम कोर्टानेही राज्यपालांचाच निर्णय योग्य ठरवत पर्रिकर यांना 48 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनोहर पर्रिकर यांनी बहुमत सिद्ध करुन दाखवलं आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 01:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close