गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची बहुमतासाठी अग्निपरीक्षा

  • Share this:

manohar_650_061314122044

16 मार्च :  गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रिकर आज विधानसभेत आपल्या सरकारचं बहुमत सिद्ध करणार आहेत. 40 सदस्यीय विधानसभेत एकूण 22 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा भाजपनं केला आहे. आज सकाळी 11 वाजता या प्रक्रियेला सुरुवात होईल.

बहुमत सिद्ध झाल्यास गोव्यात सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीवर यांच्याकडे गोव्याचं उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात येणार आहे.

मगोपला उपमुख्यमंत्रिपदासह दोन मंत्रिपदं मिळणार आहेत. तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वाधिक जागा मिळूनही काँग्रेसला गोव्यात सरकार बनवता आलं नाही. राज्यपालांनी भाजपला सरकार बनवण्याची पहिली संधी दिली. त्यावर पर्रिकर यांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने काँग्रेसची याचिका फेटाळत पर्रिकर यांना गुरूवारी आपले बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.

गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांचा मंगळवारी 14 मार्चला शपथविधी झाला. पर्रिकरांनी कोकणी भाषेत शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 16, 2017, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading