S M L

संसदेत पुन्हा घुमला सुषमांचा प्रभावी आवाज

Sonali Deshpande | Updated On: Mar 15, 2017 05:43 PM IST

संसदेत पुन्हा घुमला सुषमांचा प्रभावी आवाज

15 मार्च : केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आपल्या आजारपणानंतर आज पहिल्यांदाच संसदेत आल्या. संसद सदस्यांनी सुषमा स्वराज यांचं खुल्या दिलाने स्वागत केलं. सुषमांचा प्रभावी आवाज संसदेत पुन्हा घुमला, अशा शब्दांत लोकसभाअध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही त्यांची प्रशंसा केली. सुषमा स्वराज यांच्या आगमनाआधी संसदेच्या प्रवेशद्वारावर पत्रकार आणि छायाचित्रकारांचीही गर्दी जमली होती.

सुषमा स्वराज यांच्यावर डिसेंबर महिन्यात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्या गेले तीन महिने संसदेत येऊ शकल्या नव्हत्या. आता मात्र त्या पूर्ण विश्रांती घेऊन आणि बऱ्या होऊन परतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.

लोकसभेमध्ये सुषमांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यांना अभिवादन केलं. सभागृहातल्या सगळ्याच सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं. सुषमा स्वराज यांनी संसद सदस्यांचे आभार मानले. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळेच मी पूर्णपणे बरी होऊन संसदेत परतू शकले, असं त्या म्हणाल्या.

अमेरिकेत कन्सासमध्ये झालेल्या श्रीनिवास कुचिबोटला या भारतीय तरुणाच्या हत्येप्रकरणी सुषमा स्वराज यांनी निवेदन दिलं. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांची सरकारने गांभीर्याने दखल घेतलीय, असंही त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनिवासच्या कुटुंबीयांची विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरीने मदत देण्याचं आश्वासन दिलं हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात सरकार गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Loading...
Loading...

सुषमा स्वराज यांच्यावर 10 डिसेंबरला एम्समध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हत्या पण हॉस्पिटलमधूनही त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2017 05:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close