S M L

शपथ घेताना पर्रिकर मुख्यमंत्री हा शब्दच विसरले

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2017 06:09 PM IST

शपथ घेताना पर्रिकर मुख्यमंत्री हा शब्दच विसरले

14 मार्च :  गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी आज शपथ घेतली. मनोहर पर्रिकर यांनी कोंकणीतून शपथ घेतली. मनोहर पर्रिकर गोव्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेत. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे नेते हजर होते.

मनोहर पर्रिकर शपथ घेताना मुख्यमंत्री हा शब्दच विसरले. मग नितीन गडकरींनी त्यांना आठवण करून दिली. तोपर्यंत पर्रिकर यांनी फक्त मंत्रिपदाची शपथ घेतली होती. नंतर पर्रिकरांनी पुन्हा मुख्यमंत्री असा शब्द वापरून शपथ घेतली.

मनोहर पर्रिकर यांच्यासोबत गोव्याचे उपमुख्यमंत्री म्हणून रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर यांनीही शपथ घेतली. सुदिन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आहेत.मनोहर पर्रिकर यांच्यासह 10 मंत्र्यांनी आज शपथ घेतलीय. यामध्ये भाजपचे दोन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन, गोवा फॉरवर्डचे दोन आणि दोन अपक्षांचा समावेश आहे.

Loading...

भाजपचे फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मडकईकर यांनी शपथ घेतली. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर यांचाही समावेश करण्यात आलाय. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनीही शपथ घेतलीय. अपक्ष आमदार रोहन खवटे आणि गोविंद गावडे यांचीही मंत्रिपदी वर्णी लागलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 06:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close