14 मार्च : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये नरेंद्र मोदींमुळे विजय मिळाल्याचा दावा केला जात असला तरी राहुल गांधी यांनी मात्र मनीपॉवरमुळेच भाजपचा विजय झाल्याचा आरोप केला आहे.
उत्तरप्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मौन सोडले. मनीपॉवरमुळेच भाजपचा विजय झाल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले, पाच पैकी भाजपचा दोन राज्यांमध्ये विजय झाला. तर आम्ही तीन राज्यांमध्ये जिंकलो. भाजपने पैशाचा वापर करुन लोकशाहीची गळचेपी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपची हीच विचारधारा आम्हाला मान्य नसल्याचं, ते म्हणाले.
त्याचबरोबर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील पराभव आम्ही स्वीकारतो, असं सांगतानाच, काँग्रेस पक्षात बदल करण्याची गरज असल्याचंही त्यांनी कबूल केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा