S M L

गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Samruddha Bhambure | Updated On: Mar 14, 2017 03:44 PM IST

गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश

14 मार्च :  गोव्यात भाजपाच्या सत्ता स्थापनेला स्थगिती देण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे मनोहर पर्रिकर यांच्या शपथविधीला लागलेलं ग्रहण सुटलं आहे. मात्र गोवा विधानसभेत भाजपाला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.

यावेळी सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला जोरदार फटकारलं आहे. तुमच्याकडे बहुमत होतं तर सत्तास्थापनेसाठी दावा का केला नाही?, असा सवालही सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला विचारला आहे. गोव्यात भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निर्णयाला काँग्रेसने सुप्रिम कोर्टात आव्हान दिलं होतं.

गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. 40 जागा असलेल्या गोव्यात काँग्रेस 17 तर भाजपने 13 जागांवर विजय मिळवला होता. मात्र काँग्रेसमध्ये नेता निवडीवरुन वाद सुरू असतानाच भाजपने वेगाने चक्र फिरवून सत्तेस्थापनेसाठी मोर्चेबांधणी केली.

गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतकवादी पक्ष या छोट्या पक्षांच्या साथीने भाजप सत्तास्थापन करणार आहे. मात्र भाजपच्या सत्तास्थापनेच्या दाव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सर्वाधिक जागा काँग्रेसने मिळवूनही भाजपसा सत्ता स्थापनेदिली अशी विचारणा काँग्रेसने केली आहे. गोव्यातील विधीमंडळ पक्षाचे नेते चंद्रकांत कवळेकर यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

Loading...

या याचिकेवर आज तातडीची सुनावणी व्हावी यासाठी विशेष पीठ स्थापन करण्यात आले पर्रिकर यांच्या शपथविधी सोहळ्यास स्थगिती द्यावी, तसेच पर्रिकर यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्त करण्याचा राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसलाच सत्तास्थापनेची पहिली संधी मिळायला हवी. त्याऐवजी भाजपला ती संधी देणे घटनाबाह्य आहे असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला होता.

दरम्यान, राज्यपालांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला पहिले सत्तास्थापनेची संधी दिली पाहिजे, असं ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 01:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close