S M L

भाजपच्या विजयानंतर शेअर मार्केटमध्ये उत्साह, सेन्सेक्स आणि निफ्टीचा उच्चांक

Samruddha Bhambure | Updated On: Mar 14, 2017 12:09 PM IST

भाजपच्या विजयानंतर शेअर मार्केटमध्ये उत्साह, सेन्सेक्स आणि निफ्टीचा उच्चांक

  indian_stock_market_basics

14 मार्च :  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत  भाजपला मिळालेल्या यशाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजार उघडला आणि क्षणार्धात उसळला. सेन्सेक्सनं 616 अंशांची झेप घेतली, तर निफ्टीनं  9119 अंशांचा आपला जुना विक्रम मोडीत काढत 9122 अंशांचा उच्चांक गाठला. सुरुवातीच्या काही मिनिटांतच निफ्टी 191 अंशांनी वधारला होता.

बऱ्याच दिवसांपासून शेअर बाजाराचं लक्ष उत्तर प्रदेशातील निकालांकडे होतं. हे निकाल शनिवारी जाहीर झाले. त्यात भाजपनं इतिहास रचला. यूपी आणि उत्तराखंडमधील भाजपच्या दणदणीत यशामुळे  सरकारची राज्यसभेतील स्थिती आणखी मजबूत होणार असून त्यामुळे सुधारणांच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी शक्यता आहे. त्याचेच पडसाद आज बाजारात पाहायला मिळाले.

दरम्यान, भाजपच्या विजयामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 42 पैशांनी वधारला आहे. गेल्या वर्षभरातील रुपयाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 12:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close