S M L

मनोहर पर्रीकर यांच्या शपथविधीला काँग्रेसचं आव्हान

Samruddha Bhambure | Updated On: Mar 14, 2017 01:23 PM IST

 मनोहर पर्रीकर यांच्या शपथविधीला काँग्रेसचं आव्हान

13 मार्च : गोव्यात मनोहर पर्रीकर आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असले तरी काँग्रेसने या शपथविधीला स्थगिती मिळवण्यासाठी सुप्रिम कोर्टात दाद मागितली आहे. त्यावर आज सकाळी सुनावणी होईल.

काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्याचा निर्णय अवैध असल्याचे याचिकेत म्हटलं आहे. भाजपला सरकार स्थापन करायचं निमंत्रण देणं हे राज्यघटना आणि त्यानंतरच्या पायंडांच्या विरोधात आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

काल रात्री 10च्या सुमाराला काँग्रेसनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठोवले.. सरन्यायाधीश जे एस खेहार यांनी आज तातडीनं सुनावणी ठेवण्याचं मान्य केलं.

भाजपचे 13, दोन अपक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे प्रत्येकी 3, अशी कुमक मदतीला घेऊन 21चा जादूई आकडा कागदावर गाठण्यात भाजपला यश मिळालं आहे.

Loading...

पर्रीकर यांनी सोमवारी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, अरुण जेटली यांच्याकडे संरक्षणमंत्रीपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटलींनी गोव्याच्या तिढ्यावर प्रतिक्रिया दिलीय.. विधानसभेत जर त्रिशँकू परिस्थिती निर्माण झाली आणि निवडून आलेल्या बहुतांश आमदारांनी युती केली, तर राज्यपालांनी विधिमंडळ नेत्याला आमंत्रण देण्यात काहीच चुकीचं नाही. विधिमंडळ नेत्याला सरकार बनवण्याचं निमंत्रण देणं, आणि त्यानं थोड्याच कालावधीत बहुमत सिद्ध करावं, हे क्रमप्राप्तच आहे, असं जेटलींनी ट्विट केलंय. ते स्वतः सुप्रीम कोर्टात अनेक वर्षं प्रॅक्टिस करतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 09:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close