भाजपची 'सत्ता'गिरी, मणिपूरमध्येही सत्तेचा दावा

भाजपची 'सत्ता'गिरी, मणिपूरमध्येही सत्तेचा दावा

  • Share this:

manipur_bjp

13 मार्च : गोव्याप्रमाणेच मणिपूरमध्येही भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यायत. मणिपूरमध्ये काँग्रेस नंबर वनचा पक्ष आहे तरीही राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी मुख्यमंत्री ओक्राम इबोबि यांना राजीनामा द्यायला सांगितलाय. आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे.त्यामुळे काँग्रेसला सरकार बनवण्याची संधी द्यायला पाहिजे, असं ओक्राम इबोबि यांनी म्हटलंय.

मणिपूर विधानसभेमध्ये एकूण 60 जागा आहेत. यापैकी काँग्रेसला 28 जागा मिळाल्या तर भाजपला 21 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 31 आमदारांची आवश्यकता आहे. बहुमतासाठी आपल्याला जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा भाजपने केलाय.

भाजपला नॅशनल पीपल्स पार्टी ( एनपीपी) आणि एलजेपी यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला. हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटक पक्ष आहे.  एनपीपीला 4 जागा आणि एलजेपीची 1 जागेच्या पाठिंब्यामुळे  भाजपच्या 26 जागा झाल्या आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. अजून भाजपला 5 जागांची गरज आहे.

भाजपने आता नगा पिपल्स फ्रंटच्या समर्थनाचा दावा केलाय.  त्यामुळे 5 जागांचाही व्यवस्था झालीये. त्यानंतर काँग्रेसचा एक आमदार आणि तृणमूल काँग्रेसचा एकमेव आमदारही भाजपच्या गळाला लागलाय. त्यामुळे भाजपने 32 जागांवर दावा ठोकला आहे.

भाजप गोवा आणि मणिपूरमध्ये निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलाय. भाजप दोन्ही राज्यांत नंबर दोनचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला इथे सरकार बनवण्याचा अधिकारच नाही, असं त्यांनी म्हटलंय. तसंच भाजपने लोकशाहीची हत्या केली अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलीये. राज्य घटनेनुसार सगळ्यात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिली मान असतो. पण राज्यपाल हे मोदी सरकारच्या हातचं बाहुलं झालंय त्यामुळे लोकशाहीला गळा घोटला जात आहे असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

मणिपूर विधानसभेचा निकाल एकूण 60 जागा

बहुमताचा जादुई आकडा 31

काँग्रेस - 28

भाजप - 21

एनपीपी - 4

 एलजेपी - 1

नगा पिपल्स फ्रंट - 4

तृणमूल काँग्रेस - 1

अपक्ष -1

भाजपचं सत्तेचं गणित

भाजप  21  एनपीपी 4 एलजेपी 1, नगा पिपल्स फ्रंट 4,

तृणमूल काँग्रेस  1, अपक्ष 1 = एकूण 31

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 13, 2017, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading