होमग्राऊंडवर पर्रिकर रंगले रंगात, उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

होमग्राऊंडवर पर्रिकर रंगले रंगात, उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

  • Share this:

parikar44413 मार्च : ही होळी आणि धुळवड खास ठरलीय ती माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी...पर्रिकर उद्या गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर भाजपबरोबरच मगोप आणि गोवा फॉर्वर्डचे आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतील.

उद्याच्या शपथविधीवर चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) गोवा भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. स्वतः पर्रिकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. यावेळी त्यांनी विजयाचे रंग उधळून होळी साजरी केली.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.  नवे संरक्षणमंत्री नेमेपर्यंत त्या खात्याची जबाबदारी अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सोपवण्यात आलीये. मे 2014 मध्येही संरक्षण खातं त्यांच्याकडेच होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 13, 2017, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading