गोव्यात सरकार स्थापनेचा दावा का केला नाही ?,काँग्रेस आमदार भडकले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 13, 2017 07:34 PM IST

गोव्यात सरकार स्थापनेचा दावा का केला नाही ?,काँग्रेस आमदार भडकले

goa_congress413 मार्च : गोव्यामध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा करून काँग्रेसला चांगलाच धक्का दिला. सरकार स्थापन करण्याची आयती संधी भाजपने हिरावून घेतल्यामुळे काँग्रेसच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

गोवा विधानसभा निवडणुकीत निकालानंतर 'सत्तेसाठी काहीपण' असं नाट्य घडलं. काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा मिळाल्या बहुमतासाठी फक्त 4 जागा पाहिजे होत्या. पण, काँग्रेसकडून असा कोणताही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे भाजपला 13 जागा मिळालेल्या होत्या तरीही अपक्षांची मोट बांधून सत्ता स्थापनेचा दावा केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह गोव्यात होते. पण त्यांनी भाजपवर टीका केल्याशिवाय कोणत्याही हालचाल केली नाही. त्यामुळे काँग्रेसचे आमदार  विश्वजीत राणे, जेनिफर मॉन्सेरॉत आणि टोनी फर्नांडीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा का केला नाही ? असा संतप्त सवाल केलाय. या तिन्ही आमदारांनी दिग्विजय सिंह आणि काँग्रेस श्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली असून काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2017 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...