गोव्यात भाजपकडून अपक्षांना मंत्रिपदं,अशी बांधली अपक्षांची मोट

गोव्यात भाजपकडून अपक्षांना मंत्रिपदं,अशी बांधली अपक्षांची मोट

  • Share this:

goa_parikar312 मार्च : गोवा विधानसभेसाठी भाजपने अखेर सत्तेचं गणित जुळवलंय. 21 आमदारांसह मनोहर पर्रिकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केलाय.

गोव्यात भाजपने मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांच्या साथीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळूनही विरोधात बसावं लागणार आहे. अपक्षांसोबत ठरलेल्या सत्तेच्या सूत्रानुसार, मुख्यमंत्रीपदासह पाच मंत्रिपदं ही भाजपला मिळणार आहे. तर मगोपला 2 आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला तीन मंत्रिपदं मिळणार आहे.

महाराष्ट्र गोमंतक पक्षानं भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे भाजपचे १३ आमदार आणि मगोपचे ३ आणि एक अपक्षही त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे भाजपची संख्या  17 झाली. पण भाजपला 4 आमदारांची गरज होती. त्यानंतर गोवा फॉर्वर्डचे आमदारही भाजपच्या गळाला लागले. त्यांचे ३ आमदार मिळून भाजपने 20 जागांचा आकडा गाठला. आणि आणखी दोन अपक्षाला सोबत घेऊन भाजपने राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा ठोकला.

भाजप १३ मगोप ३ गोवा फॉर्वर्ड ३ २ अपक्ष = २१

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2017, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading