गोव्यात पुन्हा पर्रिकर सरकार, भाजपने जुळवलं सत्तेचं गणित

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2017 08:39 PM IST

गोव्यात पुन्हा पर्रिकर सरकार, भाजपने जुळवलं सत्तेचं गणित

maohar_parikar312 मार्च : गोवा विधानसभा निवडणूक निकालामध्ये दुसऱ्या नंबरवर आलेल्या भाजपने आक्रमक होत अपक्षांची मोट बांधलीच आणि सरकार स्थापनेचा दावा केलाय. भाजपने अपक्षांसह बहुमताचा 21 जागांचा आकडा गाठला असून राज्यापालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केलाय. त्याचसोबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील अशी घोषणाच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलीये.

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला 17 जागा मिळाल्यात. तर सत्ताधारी भाजपला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भाजपला 13 जागा मिळाल्यात. त्यामुळे बहुमतासाठी 21 जागेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने अपक्षांची मदत घेण्यासाठी जोरदार हालचाल सुरू केली. अमित शहांनी स्पष्ट केल्याप्रमाणे कालच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले आणि अपक्षांशी बोलणी सुरू केली. आज संध्याकाळी सर्व अपक्षांशी बोलणी यशस्वी झाली.

असं जुळवलं गणित

महाराष्ट्र गोमंतक पक्षानं भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे भाजपचे १३ आमदार आणि मगोपचे ३ आणि एक अपक्षही त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे भाजपची संख्या  17 झाली. पण भाजपला 4 आमदारांची गरज होती. त्यानंतर गोवा फॉर्वर्डचे आमदारही भाजपच्या गळाला लागले. त्यांचे ३ आमदार मिळून भाजपने 20 जागांचा आकडा गाठला. आणि आणखी एका अपक्षाला सोबत घेऊन भाजपने राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा ठोकला.

भाजप १३ मगोप ३ गोवा फॉर्वर्ड ३ २ अपक्ष = २१

Loading...

मनोहर पर्रिकर शपथविधीआधी देणार राजीनामा

गोव्यातून दिल्ली दरबारी दाखल झालेले मनोहर पर्रिकर आता पुन्हा एकदा आपल्या होमग्राऊंडमध्ये परतणार आहे. मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री झाले तरच आम्ही पाठिंबा देऊ अशी अटच अपक्षांनी घातली होती. त्यामुळे मनोहर पर्रिकर यांना गोव्यात बोलावावे लागले अशी माहितीच नितीन गडकरींनी दिली. पक्षश्रेष्ठींनीही पर्रिकरांना मुख्यमंत्री होण्यास परवानगी दिली आहे. उद्या सकाळी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देतील असंही गडकरींनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता गोव्यात पुन्हा एकदा पर्रिकर सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 08:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...