हेलिकाॅप्टरमध्ये चढताना अरुण जेटली घसरले, किरकोळ जखमी

हेलिकाॅप्टरमध्ये चढताना अरुण जेटली घसरले, किरकोळ जखमी

  • Share this:

arun_jetli412 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हरिद्वारमध्ये हेलिकाॅप्टरमधून पडून किरकोळ जखमी झाले. पदार्था हेलिपॅडवर हेलिकाॅप्टरमध्ये चढत असतांना त्याचा तोल जाऊन ते खाली पडले. डाॅक्टरांनी चेकअप केल्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं.

रविवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हरिद्वारमध्ये पतंजली फूड पार्कमध्ये एका कार्यक्रमसाठी आले होते. पदार्था येथील हेलिपॅडवर पोहचले असता हेलिकाॅप्टरमध्ये चढत असताना त्यांचा हात निसटला आणि ते खाली पडले. खाली पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आणि ते बेशुद्ध पडले. पतंजलीच्या डाॅक्टरांनी चेक अप केलं आणि जेटली यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं.  त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2017, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading