S M L

गोव्यात भाजपने अपक्षांची मोट बांधली ?, सत्तेवर दावा

Sachin Salve | Updated On: Mar 12, 2017 06:04 PM IST

गोव्यात भाजपने अपक्षांची मोट बांधली ?, सत्तेवर दावा

12 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार आघाडी घेतलीये. भाजप 23 आमदारांसह सरकार स्थापन करेल असा दावा गोव्याचे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केलाय. अपक्षांची मदतही भाजपला मिळणार आहे असं तेंडुलकर यांनी सांगितलंय.

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला 17 जागा मिळाल्यात. तर भाजप दुसऱ्या स्थानावर फेकलं गेलं. भाजपला 13 जागा मिळाल्यात. त्यामुळे बहुमतासाठी 21 जागेचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत दोन्ही पक्षांना घ्यावी लागणार आहे. भाजपने सत्तेसाठी जोरदार हालचाल सुरू केली असून अपक्षांसोबत मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केलाय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनोहर पर्रीकर यांनी गोवा फाॅरवर्डच्या आमदारांशी बोलणी सुरू केलीये. याआधी महाराष्ट्र गोमंतक पक्षानं भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे भाजपचे १३ आमदार आणि मगोपचे ३ आणि एक अपक्षही त्यांच्यासोबत गेल्याय. त्यामुळे भाजपची संख्या आता 17 झाली आहे. आता भाजपला 4 आमदारांची गरज आहे. गोवा फॉर्वर्ड भाजपला पाठिंबा देतं का हे पाहायचं. त्यांचे ३ आमदार आहेत. गोवा फाॅर्वर्डने जरी पाठिंबा दिला तरी भाजपला आणखी एका अपक्षाची मदत लागणार आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसकडे 17 जागा असून सत्ता स्थापनेसाठी फक्त 4 अपक्षांची गरज आहे. काँग्रेस  संध्याकाळी पाच वाजता काँग्रेस विधीमंडळ नेता निवडणार आहे. दिग्विजय सिंग आणि केंद्रीय निरिक्षक चेला कुमार यांची काँग्रेस आमदारांसोबत चर्चा सुरू आहे.

पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी अपक्षांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केलाय. भाजपच सरकार स्थापन करले असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 05:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close