अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

 अखिलेश यादव यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

  • Share this:

akhilesh_yadav_resign11 मार्च : उत्तर प्रदेश निवडणुकीतला पराभव मला मान्य आहे, असं म्हणत सपाचे नेते  अखिलेश यादव यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.

उत्तरप्रदेशमध्ये धुळधाण उडाल्यानंतर अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचा कौल मान्य केलाय. भाजपने समाजवादी पक्षाला कडवं आव्हान दिलं. त्यामुळे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला 403 जागांपैकी फक्त 54 जागा मिळाल्या. पण जनतेचा कौल आम्ही स्वीकारलाय, असं अखिलेश यादव म्हणाले.

मला जेवढी काम करण्याची संधी मिळाली तेवढं काम मी केलं. मी नेहमीच उत्तर प्रदेशला पुढे नेण्यासाठी काम केलंय पण जनतेला यापेक्षा जास्त कामाची अपेक्षा आहे, असंही त्यांनी मान्य केलं. मी एक्सप्रेस वे केला पण जनतेला बुलेट ट्रेन हवी आहे, असं वक्तव्य अखिलेश यांनी केलं.

उत्तर प्रदेशमध्ये मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा गंभीर आरोप मायावतींनी केलाय. यावर सरकारने विचार करावा. मीही यावर विचार करेन. पण सरकारने याचा तपास केला पाहिजे, असं ते म्हणाले. नव्या सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, अशी मागणी त्यांनी केली.

राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला मारला. मतदारांना भूलथापा देऊन मतं मिळू शकतात, असंही ते म्हणाले. आमचं काम कधीतरी आम्हाला लाभ मिळवून देईल, असा विश्वास अखिलेश यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसशी युती कायम राहील, असेही संकेत त्यांनी दिलेत. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिलेश यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल राम नाईक यांच्या सुपूर्द केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 7:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading