90 मतं मिळालेल्या 'आयर्न लेडी'चा राजकारणाला रामराम

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2017 07:25 PM IST

90 मतं मिळालेल्या 'आयर्न लेडी'चा राजकारणाला रामराम

 irom_sharmila4

11 मार्च : मणिपूरमध्ये आयर्न लेडी इरोम शर्मिला यांचा दारुण पराभव झालाय. दारूण पराभवामुळे इरोम शर्मिला यांनी आता राजकारणातून सन्यास घेण्याची घोषणाच केलीये.

मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्राम इबोबि सिंग यांना आव्हान देत इरोम शर्मिलाया निवडणुकीत उतरल्या होत्या. पण निकालाअंती त्यांना फक्त 90 मतं मिळाली. ओक्राम इबोबि सिंग हे 10 हजार 740 मतांनी निवडून आले. इरोम शर्मिला यांनी अफस्पा कायद्याच्या विरोधात 16 वर्षं उपोषण केलं होतं. आपण ही लढाई राजकीय पातळीवर लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या होत्या. एवढंच नाही मुख्यमंत्री होण्यासही आपल्याला आवडेल असंही त्या म्हणाल्या होत्या.

पीपल्स रिसर्जन्स अँड जस्टीस अलायन्स या त्यांच्या पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली होती. याआधी आपण लोकसभा निवडणूक लढवू, असं इरोम शर्मिला म्हणाल्या होत्या. पण आता मात्र आपण निवडणूकही लढवणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. या पराभवामुळे त्या अत्यंत निराश झाल्यायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...