मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे

मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे

17 जूनआषाढी एकादशीला पंढरपूरला सर्वप्रथम पोहोचणारी मुक्ताईची मानाची पालखी आज मुक्ताईनगरहून निघाली. खान्देश आणि विदर्भातील वारकरी या पालखीत सामील होतात. सलग 201 वर्षांची मानाची परंपरा असलेली ही मुक्ताईची पालखी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघाली आहे.आदिशक्ती मुक्ताईचे लुप्त स्थान म्हणून या कोथळी गावाची ओळख आहे. आषाढीला पंढरपूरला जाण्यासाठी निघणार्‍या सर्व पालख्यांची सुरुवात ही आदिशक्ती मुक्ताईची पालखी निघाल्यावरच होते. आषाढीच्या आधी वाकडी गावात श्री संत ज्ञानदेव आणि मुक्ताई या पालख्यांच्या भाऊ - बहिणीची भेट वारकरी मोठ्या भक्तीभावाने अनुभवतात.

  • Share this:

17 जून

आषाढी एकादशीला पंढरपूरला सर्वप्रथम पोहोचणारी मुक्ताईची मानाची पालखी आज मुक्ताईनगरहून निघाली. खान्देश आणि विदर्भातील वारकरी या पालखीत सामील होतात.

सलग 201 वर्षांची मानाची परंपरा असलेली ही मुक्ताईची पालखी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघाली आहे.आदिशक्ती मुक्ताईचे लुप्त स्थान म्हणून या कोथळी गावाची ओळख आहे.

आषाढीला पंढरपूरला जाण्यासाठी निघणार्‍या सर्व पालख्यांची सुरुवात ही आदिशक्ती मुक्ताईची पालखी निघाल्यावरच होते.

आषाढीच्या आधी वाकडी गावात श्री संत ज्ञानदेव आणि मुक्ताई या पालख्यांच्या भाऊ - बहिणीची भेट वारकरी मोठ्या भक्तीभावाने अनुभवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2010 03:06 PM IST

ताज्या बातम्या