S M L

चारही राज्यांत भाजपचं सरकार,अमित शहांचा दावा

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2017 05:06 PM IST

 चारही राज्यांत भाजपचं सरकार,अमित शहांचा दावा

11 मार्च : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांत भाजपचं सरकार येईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलाय. तसंच मायावतींच्या ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याच्या गंभीर आरोपावर मायावतींची मन:स्थिती समजू शकतो असा टोलाही लगावला.

उत्तरप्रदेशमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलं.  स्वातंत्र्यानंतरच्या काळात नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते आहेत, अशी स्तुतीसुमनं शहांनी उधळली.

चार राज्यांतल्या निवडणुकांच्या निकालामुळे भाजपला उत्तेजन मिळालं, असं सांगून अमित शहा यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानलेत. हा निकाल भारताच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरलाय, असंही त्यांनी म्हटलंय. तसंच पंजाबमधला भाजपचा आम्ही स्वीकारतो, असंही अमित शहा म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप मायावतींनी केला होता. यावर, मायावतींची मन:स्थिती मी समजू शकतो पण मी त्यांच्या वक्तव्यावर कोणतीही टिप्पणी देणार नाही,असं अमित शहा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 05:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close