Uttar Pradesh Election Results 2017: अखिलेश यादव यांचं काय चुकलं ?

Uttar Pradesh Election Results 2017: अखिलेश यादव यांचं काय चुकलं ?

  • Share this:

11 मार्च : उत्तर प्रदेश निवडणुकीत पराभवाचा सर्वात मोठा धक्का बसलाय तो अखिलेश यादवांना. स्वच्छ आणि कामसू अशी प्रतिमा असलेल्या अखिलेशना नेमकं काय भोवलं ?, याबद्दला हा स्पेशल रिपोर्ट

"काम बोलता है", हे घोषवाक्य होतं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलश यादव यांचं. पण मतदारांनी यावर विश्वास ठेवल्याचं दिसत नाही. 2012 मध्ये सपाला 224 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्याच्या अर्ध्याही अखिलेशना जिंकता आल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अखिलेश यांनी जेवढे दावे केले, तेवढी कामं तिथे झालेली नाहीत हे वास्तव आहे. जी कामं केली, त्याचं मोदींसारखं मार्केटिंग जमलं नाही. "काम बोलता है", हे ब्रीदवाक्य फार उशिरा जनतेसमोर आलं.

akhilesh_yadav44योद्धाच्या भात्यातून घरचेच जर बाण काढून घेत असतील, तर तो काय आणि किती लढणार?? अखिलेश यादवांची अशीच अवस्था झाली. निवडणुकीच्या तोंडावर परिवारात यादवी माजली. वडील आणि काका जाहीरपणे अखिलेशच्या विरोधात बोलू लागले. नंतर समेट झाल्यावरही मुलायम सिंगांनी मनापासून मुलाचा प्रचार केला नाही. काही ठिकाणी तर काका शिवपाल उघडपणे विरोधी उमेदवाराला पाठिंबा देत होते. त्यामुळे मुलायम सिंहांचे निष्ठावान मतदार अखिलेशपासून दूर गेले हे नक्की.

काकांचे प्रताप इथे थांबत नाहीत. 2012 साली अखिलेश सत्तेवर आल्यापासून त्यांच्या वाटेत शिवपाल अडथळे निर्माण करत गेले. कुख्यात गुंडांना मंत्रिपद द्यायला भाग पाडणं असो किंवा पुतण्यावर जाहीर टीका करणं असो.. जनतेपुढे यादव परिवारात कधीच एकी दिसली नाही. अखिलेश म्हणजे शिकाऊ आणि केवळ चेहरा, आणि सत्तेच्या चाव्या वडिल आणि काकांकडे, असंच चित्र निर्माण केलं गेलं.

60च्या दशकापासून ज्या पक्षाविरोधात मुलायम सिंहांचं अख्खं राजकारण आधारित होते, त्या काँग्रेसशी युती करणंही मतदारांना रुचलेलं दिसत नाही. "यूपी को साथ पसंद है", हे आघाडीचं ब्रीदवाक्यही मतदारांना रुचलेलं दिसत नाही. त्यात भर म्हणजे राहुल गांधींची निष्प्रभ आणि पराभूत अशी प्रतिमा. काँग्रेसचा फायदा झाला असेल कदाचित, पण अखिलेशचं नुकसान झालं हे नक्की.  असो.. कमी वयामुळे काळ अखिलेशच्या बाजूनं आहे, हे नक्की. आता 2022 मध्ये ते कसे बाऊंस बॅक करतात, ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading