केशव मौर्य होणार यूपीचे देवेंद्र फडणवीस ?

 केशव मौर्य होणार यूपीचे देवेंद्र फडणवीस ?

  • Share this:

keshva_morya411 मार्च : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या भाजपपुढे आता आणखी एक प्रश्न निर्माण झाला. तो म्हणजे कोण होणार मुख्यमंत्री ?, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमाणेच केशव प्रसाद मौर्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशमध्ये एकहाती सत्ता राखल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आहे. या शर्यतीत यूपी भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आघाडीवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुख्यमंत्रिपदासाठी केश मौर्य हे मुख्य दावेदार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केशव मौर्य यांनी कामाचा सपाटा लावला. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

प्रचारादरम्यान भाजपने ओबीसींना टार्गेट केलं जातं आहे. ही रणनीती समोर ठेवून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ओबीसी समाजाला नाराज करून चालणार नाही. यूपीमध्ये 54 टक्के ओबीसी मतदार आहे. अशात ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून  मुख्यमंत्रीपदासाठी केशव मौर्य यांच्याकडे पाहिलं जातंय.

महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमाणेच केशव मौर्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे. या व्यतिरिक्त पक्षात आणि संघामध्ये त्यांची मजबूत पकड आहे.

केशव मौर्य यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं नावही मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 2:54 PM IST

ताज्या बातम्या