'ईव्हीएम'मध्ये भाजपकडून फेरफार, निकाल थांबवा -मायावती

'ईव्हीएम'मध्ये भाजपकडून फेरफार, निकाल थांबवा -मायावती

  • Share this:

mayavati_on_evm11 मार्च :  उत्तरप्रदेशमधला निकाल आश्चर्यकारक आणि अविश्वनीय आहे. भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केला असून कोणतंही बटण दाबलं तरी मतदान हे भाजपलाच होतं होतं. त्यामुळे हा निकाल थांबवावा आणि जुन्या पद्धतीने निवडणूक घ्यावी अशी मागणीच बसपाच्या सर्वेसर्व्या मायवती यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून एकहाती सत्ता राखली आहे. तब्बल 316 जागांवर भाजपने आघाडी घेतलीये. बसपाच्या नेत्या मायावती यांनी भाजपच्या या विजयावर संशय व्यक्त केला असून पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप केलाय.

ज्या मुस्लिम बहुल भागात भाजपला मतं मिळत नाही तिथे भाजपचा उमेदवार विजयी कसा होऊ शकतो ? खुद्द मुस्लिम बहुल भागातील लोकांनी भाजपला मतदान केलं नसल्याचा दावा केलाय अशी माहितीच मायावतींनी दिली.

तसंच अलिकडे एक पत्रकारने ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची शक्यता वर्तवली होती पण त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण आजचा निकाल पाहिला तर कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. मागील निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा प्रकार घडला होता असंही मायावती यांनी म्हटलंय.

ईव्हीएम मशीनमध्ये भाजपने फेरफार केलाय.  कोणत्याही उमेदवाराला मतं दिले तर ते भाजपच्या उमेदवाराला मिळाली. ईव्हीएम मशीनमधून फेरफार करून भाजपने लोकशाहीची हत्या केली असा आरोपही मायावतींनी केला.

तसंच प्रामाणिकपणे लढला असाल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी निवडणूक आयोगाला लिहून द्यावे असं आव्हानचं मायावतींनी दिलंय.

ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे  तक्रार केली असून उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचा निकाल थांबवावा आणि ईव्हीएम मशीनची तज्ज्ञांकडून नीट तपासणी करावी अशी मागणीही मायावतींनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading