S M L

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Mar 11, 2017 01:51 PM IST

Naxal 312

11 मार्च :   उत्तर प्रदेशासह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येत असताना, छत्तीसगडमध्ये आज सकाळी माओवादी सीआरपीएफ जवानांवर जोरदार हल्ला केला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे 11 जवान शहीद झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना भेज्जी इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरात आज सकाळी 9च्या सुमारास हा हल्ला झाला. या परिसरात माओवादी लपून बसल्याची खबर मिळताच सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्यावेळी माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 11 जवान शहीद झाले. हे सर्व जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते.

दरम्यान, सुकमामध्ये माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करण्यात आली असून ते सुकमाला रवाना होत असल्याची माहिती मोदी यांनी टि्वटद्वारे दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 01:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close