Punjab Election Results 2017 : पंजाबमध्ये कॅप्टन अमरेंद्र सिंहांना मिळाली वाढदिवसाची भेट

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2017 07:54 PM IST

Punjab Election Results 2017 : पंजाबमध्ये कॅप्टन अमरेंद्र सिंहांना मिळाली वाढदिवसाची भेट

captan_amrdip_singh11 मार्च : पंजाब विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. बऱ्याच दिवसांनंतर काँग्रेसच्या वाट्याला निवडणुकीत घवघवीत यश मिळालंय. विशेष म्हणजे काँग्रेचे अध्यक्ष कॅप्टन अमरेंद्र सिंह यांचा आज वाढदिवस आहे. काँग्रेसचा हा विजय कॅप्टन अमरेंद्र सिंह यांना जणू विजयाची भेट मिळालीये.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाच्या सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली. ती कायम राहिली. सत्ताधारी शिरोमनी अकाली दल आणि भाजपला पंजाबच्या जनतेनं सत्तेवरुन खाली खेचलंय. पंजाबमध्ये सत्तेचा दावा करणारी केजरीवाल यांच्या आप पार्टीनेही जोरदार मुसंडी मारलीये. आपच्या वाट्याला 22 जागा आल्यात पण सत्ता स्थापनेचा दावा मात्र फोल ठरलाय.

पंजाबमधेय कॅप्टन अमरेंद्र सिंह हे विजयाचे शिलेदार ठरले. पतियाळामधून अमरेंद्र सिंह भक्कम आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल केलीये. तब्बल 14 हजार मतांनी त्यांनी आघाडी घेतली आणि ती विजयामध्ये बदली. आपचे उमेदवार बलबीर सिंह यांचा त्यांनी पराभव केला. तर दुसरीकडे प्रकाशसिंग बादल यांच्या विरोधातही त्यांनी निवडणूक लढली मात्र इथं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. वयाच्या 89 वर्षी बादल यांनी विजयाची नोंद केली. पण, सत्तेपासून मात्र दूर व्हावं लागलं. पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयामुळे कॅप्टन अमरेंद्र सिंह यांचं नावं आता मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 01:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...