उत्तरप्रदेशमध्ये मोदींची त्सुनामी ; सपा,काँग्रेसचा धुव्वा

उत्तरप्रदेशमध्ये मोदींची त्सुनामी ; सपा,काँग्रेसचा धुव्वा

  • Share this:

modi_banner33311 मार्च : देशाची सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुसती लाट आली नाहीतर त्सुनामी आलीये. आणि या त्सुनामीमध्ये समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपाची धुळधाण उडाली आहे. भाजपने 310 जागांवर आघाडी घेत ऐतिहासिक विजयाची नोंद केलीये.

उत्तरप्रदेश म्हणजे बाहुबलींचा किल्ला... गेल्या 17 वर्षांपासून  भाजपला उत्तरप्रदेशमध्ये पाऊल ठेवता आले नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केलीय. प्रचाराच्या पहिल्या दिवसांपासून अमित शहांनी सर्वसूत्र आपल्या हाती घेतली होती.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार बॅटिंग करून भाजपचा विजयाच्या विजयाची पायाभरणी केलीये.

विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी समाजवादी पार्टीमध्ये अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यात झाले मतभेद चव्हाट्यावर आले. हा वाद इतका विकोपाला गेला की अखिलेश यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. पण वडील मुलायम सिंह यादव यांनी मुलाच्या हट्टापुढे हात ठेकवत माघार घेतली.

अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि राहुल गांधींसोबत एकत्र निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. पण, मोदींचा करिश्मा असा चालला की उत्तरप्रदेशच्या जनतेनं अखिलेश आणि राहुल गांधी यांना साफ नाकारलं.

उत्तरप्रदेशच्या जनतेनं कधी नव्हे ते एखाद्या पक्षाला भरभरून मतं दिली. भाजपने निकालाच्या पहिल्या कलपासून जी आघाडी घेतली ती अखेरपर्यंत कायम ठेवत महाआघाडीत बदली. तब्बल 300 चा आकडा पार करून उत्तरप्रदेशच्या इतिहास सर्वाधिक जागा मिळवणार पक्ष म्हणून नोंद केली. भाजपच्या या वैभवशाली विजयामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहा उधाण आलंय. मोदींनी आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी आतापासूनच केसर होळी खेळण्यास सुरूवात केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 12:53 PM IST

ताज्या बातम्या