Uttar Pradesh Election Results 2017: मुख्यमंत्रिपदी दलित किंवा ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावा- साक्षी महाराज

Uttar Pradesh Election Results 2017: मुख्यमंत्रिपदी दलित किंवा ओबीसी व्यक्ती विराजमान व्हावा- साक्षी महाराज

  • Share this:

maharaj_sakshi20160721_350_630

11 मार्च :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप स्पष्ट बहूमताच्या अगदी जवळ पोहोचला आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता निर्माण झालेली असतानाच उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवावे, अशी गुगली भाजप नेते खासदार साक्षी महाराज यांनी टाकली आहे. यावर आता भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपने उत्तर प्रदेशात निवडणुकांना सामोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा दिला नव्हता. मात्र भाजपचं संसदीय बोर्ड याबाबतचा निर्णय घेईल, असं भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता साक्षी महाराज यांनी दलित-ओबीसी कार्ड खेळून भाजपला अडचणीत आणलं आहे.

यूपीमध्ये 20 ते 22 टक्के दलित समाज आहे, 27 टक्के मागासवर्गीय आहेत. हे लक्षात घेता दलित किंवा ओबीसींना मुख्यमंत्रिपद मिळावं, अशी साक्षी महाराजांची इच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 01:06 PM IST

ताज्या बातम्या