Uttarakhand election 2017 : देवभूमीतही भाजप जिंकलं, रावत सरकार पडलं

Uttarakhand election 2017 : देवभूमीतही भाजप जिंकलं, रावत सरकार पडलं

  • Share this:

rawat_Modi2

11 मार्च :  उत्तराखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून, भाजपने पूर्ण बहुमत मिळवत काँग्रेसचा सुपडासाफ केला आहे. तसंच  विद्यमान मुख्यमंत्री हरीश रावत यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.  हरिश रावतांच्या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सुरूवातीला आघाडीवर असलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत हे हरिद्वार ग्रामीण आणि किच्छा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र, या दोन्ही मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

उत्तराखंड विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठीची मतमोजणी सुरू आहे. या निकालामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून, 56 जागा तर सत्ताधारी काँग्रेसला 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर इतर पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 32 तर भाजपला 31 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने आपल्या समर्थक आमदारांसह हरीश रावत यांच्या नेतृवाखाली सरकार स्थापन केलं होतं.

दरम्यान, रावत यांच्या पराभवामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 03:26 PM IST

ताज्या बातम्या