Goa Election Results 2017 : गोव्यात भाजपला धक्का, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पराभूत

Goa  Election Results 2017 : गोव्यात भाजपला धक्का, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पराभूत

  • Share this:

11 मार्च :  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होतं आहे.गोव्यात सत्ताधारी भाजपला मोठा आघात बसलाय. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रे मतदारसंघातून पराभूत झाले आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे दयानंद सोपटे विजयी झाले आहे.

पार्सेकर यांचा जवळपास पाच हजार मतानी पराभव झाला आहे. २०१४ मध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. तर 2012 मध्ये मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वात भाजपने बहुमतात सरकार स्थापन केलं होतं. पण पर्रिकरांना केंद्रात संरक्षणमंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मांद्रे विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.GOA - POSTER

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 10:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading