Punjab Election Results 2017 : काँग्रेसचा 'पंजा'ब, अकाली दलाचा खालसा

Punjab Election Results 2017 : काँग्रेसचा 'पंजा'ब, अकाली दलाचा खालसा

  • Share this:

congress_flag11 मार्च : २०१४ नंतर सतत घसरत चाललेल्या काँग्रेसला पंजाबनं दिलासा दिलाय. पाच राज्यांपैकी केवळ पंजाब या एका राज्यात काँग्रेसनं स्वबळावर सत्ता काबीज केलीय.

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधल्या धक्क्यानं घायाळ झालेल्या काँग्रेससाठी ही फुंकर ठरावी. पण पंजाबमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व उजळून निघालं, असं म्हणायला जागा नाही. कारण या विजयाचे शिल्पकार आहेत कॅप्टन अमरिंदर सिंग...योगायोगानं अमरिंदर सिंग यांचा शनिवारीच वाढदिवस आहे. त्यांच्यसाठी ही विजयी भेट म्हणावी लागेल.

निकालाच्या दिवशी सकाळीच दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या घरी जल्लोषाला सुरुवात झाली होती. पण निकालाचे आकडे जसजसे येऊ लागले. तसतशी आपची निराशा झाली. दिल्लीनंतर आणखी एक राज्य जिंकण्याचं आम आदमी पार्टीचं स्वप्न मात्र धुळीला मिळालं. अकाली-भाजपच्या आघाडीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय.

इतिहासात पहिल्यांदाच यावेळी पंजाबमध्ये काँग्रेस, शिरोमणी अकाली दल-भाजप आणि आप अशी तिरंगी लढाई होती.बादलांच्या घराणेशाहीला कंटाळले होते. ड्रग्ज हा या निवडणुकीतला मुख्य मुद्दा होता.

एकीकडे सतत पराभवाला सामोरं जाण्यासाठी काँग्रेससाठी पंजाबमधला विजय दिलासादायक जरी ठरला तरी उत्तरप्रदेशमध्ये झालेला पराभवांची कारणं शोधण्याची काँग्रेसला गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 04:27 PM IST

ताज्या बातम्या