S M L

LIVE : यूपी आणि उत्तराखंडमध्ये भाजपची जोरदार आघाडी

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2017 09:34 AM IST

LIVE :  यूपी आणि उत्तराखंडमध्ये भाजपची जोरदार आघाडी

 

11 मार्च : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांना आता अवघे काही तास उरले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्यामुळे कोण विजयाचे रंग उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

देशाची सर्वात मोठी विधानसभा असलेल्या उत्तरप्रदेशसह उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबाचा निकालाला आता काही तास उरले आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मात्र, एक्झिट पोलमध्ये पाचही राज्यात भाजप मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. पंजाबमध्ये आप मुसंडी मारणार असल्यामुळे तिथे आपने आतापासून विजयी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे.

तर दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये निकालाआधीच अखिलेश यादव यांनी मायावतींसोबत युती करण्याचे संकेत दिलेत. मात्र, मायावतीने ते फेटाळून लावलंय. काँग्रेसनेही आपल्यापरीने तयारी केली असून आपला एक्झिट पोलवर विश्वास नाही, असं राहुल गांधींनी म्हटलंय. पाचही राज्यांत काँग्रेसला चांगलं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

गोव्यामध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण होऊ शकते, असंही या एक्झिट पोलसमध्ये म्हटलंय. उद्याचा दिवस म्हणूनच महत्त्वाचा आहे कारण या राज्यांच्या निकालावर 2019 च्या लोकसभा निवडणुकांचा निकाल अवलंबून आहे असणार आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 09:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close