S M L

हे आहेत उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2017 08:25 PM IST

हे आहेत उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

10 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये भाजपला चांगलं यश मिळेल, असा सगळ्याच एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. त्यामुळे आता भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ लागलीय. उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढली असली तरी आता मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडतेय याची चर्चा सुरू झालीय.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची उत्तर प्रदेशात पुन्हा येण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशमधला सामाजिक आणि जातीय समतोल सांभाळून भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी निवड करावी लागेल. विधानसभेत भाजपला ज्या मतदारांनी मतदान केलंय त्या गटाचा प्रतिनिधी भाजप मुख्यमंत्रिपदी नेमू शकतं. कारण या विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीचाही विचार करणं महत्त्वाचं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गैरयादव ओबीसी आणि उच्चवर्णियांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने केला.  या फॉर्म्युल्यानुसार उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आली तर राज्याचा मुख्यमंत्रीही याच गटातून निवडला जाईल. ओबीसी वर्गातून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव मौर्य आणि बरेलीचे खासदार संतोष  गंगवार यांची नावं पुढे येतायत. मुख्यमंत्रिपदी केशव मौर्य यांची निवड झाली तर बऱ्याच वर्षांनी पूर्वांचलला या पदी प्रतिनिधित्व मिळेल.

up_cm_election2संतोष गंगवार हेही उत्तर प्रदेशमधले दिग्गज भाजप नेते आहेत. गंगवार हे कुर्मी गटाचं प्रतिनिधित्व करतात. कुर्मी समाज हाही भाजपचा अनेक वर्षं पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे त्यांचीही निवड होऊ शकते.

याबरोबरच केंद्रीय मंत्री महेश शर्मी यांचंही नाव शर्यतीत आहे. उच्चवर्णीय गटाचं प्रतिनिधित्व करणारे महेश शर्मा हे नॉयडामधले डॉक्टर आहेत. ते संघाच्या जवळचे मानले जातात पण त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ते वादातही अडकले होते. दळणवळण मंत्री आणि गाझीपूरचे खासदार मनोज सिन्हा यांचंही नाव चर्चेत आहे. ते बनारस हिंदू विद्यापीठाचे पदवीधर आहेत आणि भूमिहार समाजामधले आहेत.

Loading...

उमा भारती आणि कलराज मिश्रा यांचीही नावं मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय योगी आदित्यनाथ यांचंही नाव पुढे केलं जातंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक नेत्यांचा योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा आहे पण राज्यातली जातीय समीकरणं पाहता योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करणं भाजपला परवडणारं नाही.

लोकसभेची 2019 ची निवडणूक भाजपला जिंकायची असेल तर इथे एक सर्वसमावेशक नेतृत्व भाजपला द्यावं लागेल. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री हे राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 07:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close