सट्टा बाजाराचा सपा-काँग्रेसला कौल, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

सट्टा बाजाराचा सपा-काँग्रेसला कौल, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

  • Share this:

rahul_And_akhilesh10 मार्च : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता काही तासांवर येऊ ठेपली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पण, दुसरीकडे सट्टा बाजाराने मात्र सपा आणि काँग्रेसला कौल दिलाय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातच्या सट्टा बाजाराने सर्वात जास्त भाव सपा आणि काँग्रेसच्या युतीला लावलाय. मुंबई, दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्येही या युतीला जास्त भाव लावलाय.

सट्टा बाजाराने लावलेल्या भावानुसार सपा आणि काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल. गुजरातच्या सट्टा बाजाराने सपा आणि काँग्रेसला 220 ते 225 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर भाजपला 100-103 जागा मिळतील आणि मायावतींच्या बसपाला 60 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. मध्यप्रदेशमध्ये सट्टा बाजाराने सपा आणि काँग्रेसला 236 जागा, भाजपला 77 ते 80 आणि बसपाला 61 ते 63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय.

तर मुंबईमध्येही सपा आणि काँग्रेसच्या युतीला 270 ते 225 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर भाजपला 95 ते 100 आणि बसपाला 64 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजधानी दिल्लीचा सट्टा बाजारही सपा-काँग्रेस युतीचं सरकार बनले असा अंदाज वर्तवतेय. युतीला 229 ते 233 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर भाजपला 90 ते 94 आणि बसपाला 65 ते 68 जागा मिळतील.

आता काही तासांत निकाल स्पष्ट होईल आणि जनतेचा फैसला काय असेल याचं खंरखुरं चित्र समोर येईल. तेव्हाच एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील की सट्टा बाजाराचे दावे हे लवकरच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 10, 2017, 5:10 PM IST

ताज्या बातम्या