S M L

श्रीनगरजवळ बर्फात गुदमरुन कोल्हापूरचे जवान महादेव तुपारेंचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Mar 10, 2017 01:34 PM IST

श्रीनगरजवळ बर्फात गुदमरुन कोल्हापूरचे जवान महादेव तुपारेंचा मृत्यू

10 मार्च :  लेह-श्रीनगर मार्गावरील दराज इथे महिपाळगड (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी, 8 मार्चला ही घटना घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

महादेव तुपारे यांचा बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी तुपारे कुटुंबियांनी गुरुवारी कळवली. महादेव तुपारे हे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे २००५ साली सैन्यात दाखल झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते.


दरम्यान, लेह-श्रीनगर भागात बर्फवृष्टी होत असल्याने महादेव यांचं पार्थिव पोहोचवण्यासाठी अडथळा येत असल्याचं समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 09:23 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close