'हत्ती' 'सायकल'वर बसणार ?,अखिलेश यादव यांचे मायावतींसोबत युतीचे संकेत

'हत्ती' 'सायकल'वर बसणार ?,अखिलेश यादव यांचे मायावतींसोबत युतीचे संकेत

  • Share this:

akhilesh_mayavati09 मार्च : एक्झिट पोलचे अंदाज येत असतानाच सपाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशात मायावतींशी युतीचे संकेत दिले आहे. बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिलेत.

मी मायावतींचा आदर करतो. त्यामुळे समाजवादी पक्ष बसपासोबत जाईल असं लोक म्हणत असतील असं अखिलेश म्हणाले. बहुमत मिळालं नाही तर काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. प्रश्न जर तर चा असला तरी समाजवादी पक्षाचच सरकार येईल असंही ते म्हणाले.

राज्यात राष्ट्रपती राजवट कुणाला नको असते असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखिलेश आणि मायावतींशी फोनवरून चर्चा केली. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र राहायला पाहिजे असं ममतांनी या दोनही नेत्यांना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 10:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading