EXITPolls2017 : युपीत भाजप मोठा पक्ष,उत्तराखंड-मणिपूरमध्येही 'कमळ' उमलणार ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2017 07:30 AM IST

EXITPolls2017 : युपीत भाजप मोठा पक्ष,उत्तराखंड-मणिपूरमध्येही 'कमळ' उमलणार ?

up_exit_poll11 मार्च : लोकसभा निवडणुकीची चाचणी परिक्षा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलने आपले अंदाज वर्तवले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला 185 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर सपा-काँग्रेसला 120 जागा आणि बसपला 90 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे  उत्तर प्रदेशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार शक्यता आहे.

मणिपूरमधील इंडिया टीव्ही सी-व्होटरचे एक्झिट पोलनुसार भाजपला 25 ते 31 जागा, काँग्रेसला 17 ते 23 तर काँग्रेसला 17 ते 23 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

पंजाबच्या आखाड्यामध्ये  भाजप-अकाली दल खालसा होणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आलाय.  इंडिया टुडे- एक्सिसचा एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 62-71 जागा मिळण्याची शक्यता आहे.  पंजाबमध्ये पहिल्यांदाच लढणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या  आप जोरदार मुसंडी मारणार आहे. आपला 42-51 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

गोव्यात भाजप विरुद्ध संघ अशी लढाई रंगलीये. न्यूज एक्स- एमआरसीचा एक्झिट पोलनुसार  गोव्यात भाजपला सर्वाधिक 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 10 जागा मिळण्याचा  अंदाज आहे. तर आपला 7 जागा मिळतील आणि अपक्षांच्या वाट्याला 6 जागा मिळतील असा अंदाज आहे.

उत्तराखंडचे न्यूज-24 टुडेज चाणक्यचे एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला  53 जागा मिळून बहुमत मिळेल अशी शक्यता आहे. तर काँग्रेसला 15 मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Loading...

 

उत्तरप्रदेश

- इंडिया न्यूज आणि एम.आर.सी ( एकूण जागा 40 )

भाजप - 185

सपा -120

बसपा - 90

इतर -08

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश पहिला टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 33 ते 39 जागा (32 टक्के मतं)

सपा-काँग्रेस – 20 ते 26 जागा (28 टक्के मतं)

बसपा – 20 ते 26 जगा (26 टक्के मतं)

इतर – 12 ते 16 जागा (14 टक्के मतं.)

एबीपी – सीएसडीएस  - उत्तरप्रदेश दुसरा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 15 ते 21 जागा

सपा-काँग्रेस – 37 ते 43 जागा

बसपा – 07 ते 11 जागा

इतर – 02

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश तिसरा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप  33% –  27-33 जागा

सपा 34 % – 25-31 जागा

बसपा 23 % – 9-13 जागा

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश चौथा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप  36% –  27-33 जागा

सपा 33 % – 16-22 जागा

बसपा 20 % – 2-6 जागा

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश पाचवा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 14-20

सपा-काँग्रेस – 21-27

बसपा – 8-12

इतर - 02

एबीपी–सीएसडीएस - उत्तरप्रदेश सहावा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 18-24

सपा-काँग्रेस–14-20

बसपा – 8-12

इतर - 02

टाईम्स नाऊ – व्हीएमआर - उत्तरप्रदेश (एकूण जागा 403)

भाजप – 190 ते 210

सपा-काँग्रेस – 110 ते 130

बसपा – 57 ते 74

इतर - 08

पंजाब

न्यूज एक्स – एम.आर.सी - पंजाब (एकूण जागा 117)

अकाली दल – भाजप – 07

आप – 55

काँग्रेस - 55

पंजाब – टुडेज् चाणक्य (एकूण जागा 117)

काँग्रेस – 54

आप – 54

अकाली-भाजप – 09

सीएनएन न्यूज 18 ग्रॅमनर - पंजाब (एकूण जागा 117)

अकाली-भाजप – 07

काँग्रेस – 53

आप - 57

गोवा ( एकूण जागा 40 )

इंडिया टीव्ही आणि सी व्होटर - गोवा ( एकूण जागा 40 )

भाजप - 15 ते 21

आप -04

काँग्रेस - 12 ते 18

इतर - 2 ते 8

न्यूज एक्स – एम.आर.सी - गोवा ( एकूण जागा 40 )

भाजप – 15

काँग्रेस – 10

आप – 07

मगोप – 02

इतर - 06

उत्तराखंड  (एकूण 70 जागा)

न्यूज 24 आणि टुडेज् चाणक्य - उत्तराखंड (एकूण 70 जागा )

भाजप -53

काँग्रेस -15

इतर -02

इंडिया टीव्ही – सी. व्होटर - उत्तराखंड (एकूण 70 जागा)

 काँग्रेस – 29 ते 35

भाजप – 29 ते 35

इतर – 2 ते 9

न्यूज एक्स – एम.आर.सी - उत्तराखंड (एकूण जागा 70)

भाजप – 38

काँग्रेस – 30

इतर - 02

सीएनएन न्यूज 18 ग्रॅमनर  (एकूण जागा 70)

भाजप – 38

काँग्रेस – 26

इतर - 06

इंडिया टुडे- एक्सिस - उत्तराखंड

भाजप – 46-53

काँग्रेस- 12-21

बसपा – 1-2

इतर – 1-4

मणिपूर (एकूण जागा 60)

एबीपी–सीएसडीएस

भाजप –25-31

काँग्रेस- 17-23

इतर – 9-15

=========================================================================================================

 

उत्तरप्रदेशमधील चर्चेतले मुद्दे

- समाजवादी पक्षातली फाटाफूट, अखिलेशचे नेतृत्व

- मोदींची लोकप्रियता आणि नोटाबंदी

- गुंडगिरी, मुस्लिमांमधील वाढता संभ्रम

- पश्चिम उत्तरप्रदेश हिंदू-मुस्लिम वाढती तेढ

- विकासाच्या मुद्यावर अखिलेशनं लढवली निवडणूक

- मुस्लिमांची मते नेमकी कुणाला मिळणार?

- मायावती कमबॅक करणार का ?

 - उत्तरप्रदेशचे पक्षीय बलाबल 2012

एकूण जागा - 403

सपा - 224

बसपा - 80

भाजप - 47

काँग्रेस - 28

इतर - 24

पंजाबचे पक्षीय बलाबल 2012

एकूण जागा - 117

अकाली दल - 56

भाजप - 12

काँग्रेस - 46

इतर - 3

 गोव्यातील चर्चेतले मुद्दे

- ऐन निवडणुकीच्या तोंडावर वेलिंगकरांची बंडखोरी

- गोव्यात संघाची भूमिका सर्वात महत्वाची

- भाजप आणि मगोपाची तुटलेली युती

- संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांची प्रतिष्ठा पणाला

- काँग्रेस सत्तेच्या जवळ जाणार का ?

- गोव्यात आपची जादू चालणार का ?

 गोव्यातील पक्षीय बलाबल - 2012

एकूण जागा - 40

भाजप - 21

काँग्रेस - 9

मगोप - 3

इतर - 7

 उत्तराखंडचे चर्चेतले मुद्दे

- काँग्रेसचे नेते हरीश रावत यांची लोकप्रियता

- आलटून-पालटून सत्तापालटाची परंपरा

- काँग्रेस आणि भाजपला गटबाजीचं ग्रहण

- मोदींची लोकप्रियता भाजपला यश देईल का?

 - उत्तराखंडमधील पक्षीय बलाबल

एकूण जागा - 70

काँग्रेस - 32

भाजप - 31

बसपा - 3

अपक्ष - 1

इतर - 3

 मणिपूरमधील चर्चेतले मुद्दे

- लष्कराला दिलेल्या विशेषाधिकारावरून स्थानिकांमध्ये रोष

- इरोम शर्मिला यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष

- काँग्रेसच्या विरोधात जनतेत असंतोष

- आसामप्रमाणेच मणिपूरमध्येही भाजपला यश मिळेल का ?

- नागा बंडखोरांसोबत केलेल्या कराराबाबत नागरिकांमध्ये संशय

पक्षीय बलाबल - 2012

एकूण जागा - 60

- काँग्रेस - 37 5 = 42

- तृणमूल काँग्रेस - 7

- भाजप - 2 (पोटनिवडणुकीतलं यश)

- नागा पीपल्स पार्टी अपक्ष - 7

- इतर - 2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 07:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...