S M L

सरताज मोहम्मद यांचा मला अभिमान -राजनाथ सिंह

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2017 05:01 PM IST

rajnath-singh_13_0_0_0_0_0_1_0_1_009 मार्च : लखनौ हल्ल्यातला अतिरेकी सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह स्वीकारायला नकार दिलाय. सरताज मोहम्मद यांनी या प्रकरणी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. सरताज मोहम्मद यांच्याबदद्ल मी सहानुभूती व्यक्त करतो, असं त्यांनी लोकसभेत सांगितलं. सभागृह माझ्याशी सहमत असेल, अशी मी अपेक्षा करतो, असंही ते म्हणाले. सरकारला मोहम्मद सरताज यांच्याबद्दल अभिमान आहे हेही त्यांनी आवर्जून सांगितलं.

लखनौमध्ये 12 तास चाललेल्या सुरक्षा दलांच्या ऑपरेशनमध्ये सैफुल्ला मारला गेला. कमांडोंनी त्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न केले पण सैफुल्लाने शरण यायला नकार दिला. त्यामुळे त्याला ठार करण्यात आलं. सैफुल्लाच्या मृतदेहाजवळ आयसिसचा झेंडा आणि ट्रेनचं टाईमटेबल सापडलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी या हल्ल्याचा संबंध आहे.

या 9 अतिरेक्यांच्या गटाला बाहेरून मदत मिळत नाहीये, असं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलंय. पण भारताबाहेरून काही जण या अतिरेक्यांना पाठिंबा देत होते, असं राष्ट्रीय तपास यंत्रणेचं म्हणणं आहे. या अतिरेक्यांची पद्धत आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांशी मिळतीजुळती आहे आणि आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये  त्यांच्या कारवाया सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close