S M L

असं घडलं सैफुल्लाचं एनकाऊंटर

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2017 04:52 PM IST

असं घडलं सैफुल्लाचं एनकाऊंटर

वैभव सोनवणे,पुणे

09 मार्च : लखनऊ मध्ये युपी पोलिसांनी केलेल्या सैफुल्लाचा एन्काऊंटर नंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास सैफुल्लाचे वडील सरताज यांनी नकार दिलाय. त्या मागच कारणंही तसंच आहे. कुटुंबीयांनी वारंवार विनंती करूनही सैफुल्लाने पोलिसांना शरण येण्यास नकार दिला आणि आपण मारायला तयार असल्याचं सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईला कुठलीच हरकत घेतली नाही.

उज्जैन भोपाळ एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर युपी पोलिसांनी मोठा तपास सुरू केलेला असतानाच कर्नाटक,तेलंगणा आणि केरळ पोलिसांच्या मदतीने या स्फोटात आयसिसच्या विचारांनी प्रेरित असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर तपास करत असतानाच लखनऊच्या हाजी कॉलनीमध्ये सैफुल्ला आणि त्याचे दोन साथीदार राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दहशतवाद विरोधी पथकांनी हा सगळं भाग ताब्यात घेतल्यानंतर सैफुल्लाच्या कुटुंबीयांनी एन्काउंटर होण्यापूर्वी त्याला शरण आणण्यासाठी मध्यस्थी करावी असा निर्णय युपी पोलिसांनी घेतला होता.

काय घडलं नेमकं ?

या ठिकाणी झालं सैफुल्लाचं एनकाऊंटर

या ठिकाणी झालं सैफुल्लाचं एनकाऊंटर

युपी पोलिसांनी कानपूरला असलेल्या सैफुल्लाच्या भावाला खालिदला मध्यस्ती करण्यास सांगितलं

सुमारे तासभर खालिद त्याला शरण येण्याची विनवणी करत होता मात्र सैफुल्ला ऐकत नव्हता

सैफुल्ला ऐकत नसल्याने त्याचे वडील सरताज यांना मध्यस्ती करण्यास सांगण्यात आलं

वडील सरताज यांनी वारंवार विनंती करूनही सैफुल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता

सैफुल्ला सतत मरायला तयार असल्याचं सांगत होता

त्याला अल्लाची शपथ घालूनही तो ऐकत नसल्याने सैफुल्लाचे वडील सरताज यांच्या अश्रूंचा बांध फुटला

त्याच अवस्थेत त्यांनी पोलिसांना कारवाई करायला आपली कुठलीच हरकत नसल्याचं स्पष्ट केलं.

त्यानंतर तासाभरातच पोलिसांनी सैफुल्लाच एन्काउंटर केलं

सैफुल्लाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी त्याचे वडील सरताज यांना सांगितलं. पण एका दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका सरताज यांनी घेतली.

सिरियात होत असलेल्या आयसिसच्या पाडावानंतर आयसिसच्या हँडलर्सनी त्यांची रणनीती बदलल्याचं स्पष्ट झालंय. 'लोन वोल्फ' ही आयसिसची नवी रणनीती असल्याचं एनआयएच्या फेब्रुवारी महिन्यातील रिपोर्ट मध्ये स्पष्ट झालंय. संघटना उभारण्यापेक्षा एकच व्यक्तीला रॅडिकल करून त्याच्याकडूनच घातपात घडवण्याचा या हँडलर्स प्रयत्न आहे. मास ट्रान्सपोर्ट सिस्टीम हे हल्ल्याचं मुख्य लक्ष्य असणार आहे. गेले काही दिवस रेल्वे रुळांच्या भोवती सापडणारी स्फोटक ही अश्याच हल्ल्यांचा प्रयत्न असल्याची शंका ही एनआयएच्या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे.

एनआयए च्या रिपोर्ट नंतर आयसिसच्या विचारधारेने प्रभावित असलेल्या तरुणांकडून हल्ल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस महासंचालकांकडून विशेष आदेश देण्यात आले. त्यानुसार,

- मध्य आखाती देशातून ट्रान्स्फर सर्टिफिकेट वॉर येणाऱ्या तरुणांवर विशेष लक्ष

- रेल्वे रुळांची सातत्याने तपासणी करण्याचे स्थानिक पोलिसांना आदेशही देण्यात आले.

- विशेष मोहीम म्हणून महाराष्ट्रभर एटीएसने राबवलेल्या मोहिमेत आयसिसच्या संपर्कात गेलेल्या जवळपास ४० तरुणांना डिरॅडिकलाईज करण्यात एटीएसला यश

स्थानिक पातळीवर संघटना उभारून नियोजन करून दहशतवादी हल्ले करायच्या पद्धतीत आयसिसने बदल करून नव्याने तरुणांना सोशल मीडियाद्वारे आकर्षित करून त्यांना कट्टरवादाकडे ओढून एकट्याने कारवाया करायला प्रवृत्त करायचा हा डाव आहे.

अनेकदा एकमेकांना ओळखत नसलेल्या तरुणांना एका ठिकाणी जाऊन अचानक हल्ला करायला सांगण्याचे ही पर्यटन केले जाऊ शकतात. त्यामुळे येत्या काळात सिरियात पाडाव होत असलेल्या आयसिसचे परतणारे हस्तक किंवा देशात असलेल्या समर्थकांना पोलिसांना लक्ष्य करावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close