S M L

'माझा मुलगा देशद्रोही, मृतदेह ताब्यात न घेण्याचा मला अभिमान वाटतोय'

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2017 05:49 PM IST

'माझा मुलगा देशद्रोही, मृतदेह ताब्यात न घेण्याचा मला अभिमान वाटतोय'

09 मार्च : लखनौच्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या सैफुल्लाचा मृतदेह ताब्यात घ्यायला त्याच्या वडिलांनी सपशेल नकार दिलाय. सैफुल्ला हा देशद्रोही आहे, त्याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा मला अभिमान वाटतोय असे उद्गार त्यांनी काढलेय. आयसिसच्या प्रचाराला बळी पडून सैफुल्लाने देशविरोधी कृत्य कसं केलं, असा प्रश्न सैफुल्लाच्या कुटुंबीयांना पडलाय.

कॉमर्सची डिग्री घेत असताना सैफुल्लाने दुसऱ्याच वर्षी कॉलेज सोडलं आणि दोन महिन्यांपूर्वी तो मुंबईला गेला होता. आपल्याला सौदी अरेबियाला जायचंय आणि व्हिसाच्या कामासाठी मुंबईला जातोय, असं त्याने आपल्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. पण त्याचा अतिरेक्यांशी संबंध आला असावा, असं सैफुल्लाचा भाऊ खलिद मोहम्मद याने सांगितलं. पोलिसांनी अशा लोकांना कठोर शिक्षा करावी, असंही त्याने म्हटलंय.

सैफुल्लाने शरण यावं म्हणून पोलिसांनी मोहम्मदला फोन केला होता. मोहम्मदने सैफुल्लाला शरण येण्यासाठी सांगावं, असा त्यांचा उद्देश होता.

'मी सैफुल्लाशी बोलायचा प्रयत्न केला पण मला त्याचा आवाजही ऐकू आला नाही. मला फक्त बंदुकीच्या फैरींचे आवाज ऐकू येत होते', अशीही माहिती मोहम्मदने दिली.

सैफुल्लाचे दोन मोठे भाऊ आणि वडील हे एका चामड्याच्या कंपनीत सुपरवायझरचं काम करतात. सैफुल्लाचे वडील सरताज यांनी त्याचा मृतदेह स्वीकारायला नकार दिलाय. एक देशद्रोही आपला मुलगा असू शकत नाही, असं त्यांनी परखडपणे सांगितलं.

कानपूरच्या जाजमौ भागात सैफुल्लाचं घर आहे. सैफुल्ला हा तसा शांत स्वभावाचा तरुण होता आणि तो मदरशामध्ये नेहमी प्रार्थना करायला जायचा, असं त्याच्या शेजाऱ्यांनी म्हटलंय. तो असं काही टोकाचं पाऊल उचलेल, असं आम्हाला कधी वाटलंही नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

सैफुल्लाच्या तीन चुलतभावांनाही पोलिसांनी अटक केलीय. त्यातल्या एकाचा मध्य प्रदेशमधल्या ट्रेन बॉम्बस्फोटाशी संबंध आहे. त्यानेच पोलिसांना सैफुल्लाबद्दलची माहिती दिली, अशी सूत्रांची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close