लखनऊतील चकमकीत 1 दहशतवादी ठार

लखनऊतील चकमकीत 1 दहशतवादी ठार

  • Share this:

57517795

08 मार्च :  उत्तर प्रदेशातील ठाकूरगंजमध्ये लपलेल्या संशयित दहशतवादी सैफुल्ला हा एटीएसने केलेल्या कारवाईत ठार झाला. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि या संशयित दहशतवाद्यात 11 तासांहून अधिक वेळ चकमक सुरू होती.

पहाटे तीनच्या सुमारास हा संशयित दहशतवादी ठार झाला. सुरुवातीला दोन ते तीन दहशतवादी लपल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र कारवाईनंतर एकच दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सैफुल्लाह आयसिसशी संबंधित असल्याची माहिती एसटीएन दिली आहे.

ठाकूरगंजमधील हाजी कॉलनीत रेल्वे घातपातातील संशयित सैफुल्ला लपून बसल्याची खबर एटीएसला मिळाली होती. त्याआधारे एटीएसच्या पथकाने छापा टाकून सैफुल्लाला शरण येण्याचं आवाहन केलं होत. मात्र तो शरण आला नाही.

त्यानंतर एटीएसच्या जवानांनी घरात घुसून संशयित दहशतवादी सैफुल्ला याचा खात्मा केला. ठार झालेला दहशतवादी हा आयएसआयएसच्या खोरासन मॉड्यूलचा सदस्य होता, अशी माहिती एटीएसचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी दिली. दहशतवाद्याला ठार केल्यानंतर संपूर्ण परिसराची आणि घराची एटीएसने तपासणी केली.

दरम्यान, ठाकूरगंज हा वर्दळाची भाग म्हणून ओळला जातो. इथून उत्तर प्रदेश विधानसभा 8 किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे वातावरण असल्याने हे प्रकरण गंभीर मानले जात आहे.

आतापर्यंत भारतात आयसिसकडून दहशतवादी हल्ला झाला नव्हता. त्यामुळे देशात आयसीसने घडवलेला हा पहिलाच हल्ला मानला जात आहे. सोबतच आयसिसके भारतात शिरकाव केल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 10:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading