S M L

गडकरींच्या कार्यपद्धतीवर मोदींची गुजरातमध्ये स्तुतिसुमने

Samruddha Bhambure | Updated On: Mar 8, 2017 09:28 AM IST

गडकरींच्या कार्यपद्धतीवर मोदींची गुजरातमध्ये स्तुतिसुमने

08 मार्च :  केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी धडाकेबाज काम करतात. त्यांच्या धाडसी निर्णय क्षमतेने देश दिवसाला 22 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधतो आहे, अशी स्तुतिसुमने उधळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणाले, ‘घोषणा मी करतो, पण त्याचं श्रेय गडकरींचं असतं...’

मोदी सहसा जाहीररीत्या कोणाचे फारसे कौतुक करीत नाहीत. सहकारी मंत्र्यांबाबत त्यांच्या तोंडी कौतुकाचे शब्द क्वचितच असतात. पण मंगळवारचा दिवस त्याला अपवाद होता. गडकरींच्या धाडसी व धडाकेबाज कार्यपद्धतीचे ते आवर्जून कौतुक करीत होते, ते ही त्यांच्या गुजरातमध्ये. निमित्त होते ते मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील भडोच शहराजवळ नर्मदा नदीवर बांधलेल्या सहा पदरी ‘एक्स्ट्राडोस्ड’ पुलाच्या लोकापर्णाचे. अनेक वर्षांपासून रेंगाळलेला; पण गडकरींनी केवळ 34 महिन्यांत मार्गी लावलेल्या या भव्य पुलाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले, तेव्हा हजारोंच्या जमावापुढे त्यांनी गडकरींचे कोणताही हच्चा राखून न ठेवता कौतुक केले. पण प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याची संस्कृती गुजरातची आहे आणि ती देशभरम् नेणार असल्याचं मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 08:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close