S M L

लखनऊमधील ठाकुरगंजमध्ये 3 अतिरेकी घुसले, सर्च आॅपरेशन सुरू

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2017 06:17 PM IST

लखनऊमधील ठाकुरगंजमध्ये 3 अतिरेकी घुसले, सर्च आॅपरेशन सुरू

07 मार्च : उत्तर प्रदेशात लखनऊ शहराच्या बाहेरच्या भागातल्या एका घरात तीन अतिरेकी घुसल्याचा संशय आहे. हे अतिरेकी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू असल्याचीही माहिती मिळतेय. लखनऊजवळच्या ठाकुरगंज भागात हाजी कॉलनीमध्ये हे अतिरेकी घुसल्याच्या या बातमीला उत्तर प्रदेश पोलिसांनीही दुजोरा दिलाय.

ठाकुरगंज भागाच्या आसपासच्या परिसरात पोलिसांनी जमावबंदी केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 कमांडोंनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतलाय. या पथकात एटीएसच्या कमांडोंचाही समावेश आहे. गुप्तचर विभागाने लखनऊजवळच्या एका घरात अतिरेकी घुसल्याची खबर पोलिसांनी दिली आणि नंतर हे ऑपरेशन सुरू झालं.

मध्य प्रदेशमध्ये सोमवारी ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 9 जण जखमी झाले. हा स्फोट घडवून आणणारे अतिरेकी आणि लखनऊजवळ घरात घुसलेले संशयित अतिरेकी यांच्यामध्ये काही संबंध असावा, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिलीय.

लखनौमध्ये उद्या मतदान होतंय. हा मतदानाचा आठवा टप्पा आहे. या निवडणुकांचा निकाल 11 मार्चला आहे.निवडणुकीच्या दिवसात ही घटना घडल्याने सुरक्षेची जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 06:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close