आयएनएस विराटला अखेरची सलामी, पण पुढे काय ?

आयएनएस विराटला अखेरची सलामी, पण पुढे काय ?

  • Share this:

ins_virat206 मार्च : जगातील सर्वाधिक काळ नौदलाची सेवा बजावलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटला अखेरची सलामी देण्यात आलीये.  ब्रिटीश राॅयल नेव्हीची २७ वर्षे आणि भारतीय नौदलाची २९ वर्षे सेवा बजावल्या नंतर आज अखेर आयएनएस विराटला निवृत्त करण्यात आली.

भारतीय नौदलाची तब्बल २९ वर्षे आणि ब्रिटिश रॉयल नौदलाची २७ वर्षे सेवा या युद्धनौकेने केलीय. मुंबईच्या नौदल गोदीत संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी आयएनएस विराटला अखेरची सलामी देण्यात आली.

यासाठी भारतीय नौदलाने खास तयारी केली होती. या विशेष निरोप कार्यक्रमात ब्रिटीश रॉयल राॅयल नेव्हीचे प्रमुख सर फिलीप जोन्स आणि भारताचे नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा उपस्थित होते.

ins_viratनिवृत्त होण्यापूर्वी या युद्धनौकेवरील सर्व शस्त्र आणि लढाऊ विमानं काढण्यात आली. पण सर्वांच्या मनात सध्या एकच प्रश्नं आहे तो म्हणजे निवृत्तीनंतर आयएनएस विराटचं काय होणार ? आंध्र प्रदेश सरकारने आयएनएस विराटचं नौदल संग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव होता पण अजून या प्रस्तावाला अधिकृत स्वरूप देण्यात आलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...