बचत खात्यात किमान रक्कम आवश्यक, नाही तर एसबीआय ठोठावणार दंड

Sonali Deshpande | Updated On: Mar 6, 2017 10:42 AM IST

sbi_bank

06 मार्च : बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर भारतीय स्टेट बँक (एसबीआय) खातेदाराला १ एप्रिलपासून दंड आकारणार आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा एसबीआयने दंडाची आकारणी करायचं ठरवलं आहे. याचबरोबर बँकेने एटीएमसह अन्य सेवांवरील शुल्कांत सुधारणा केली आहे. याला रिझर्व्ह बँकेने अनुमती दिली आहे.

बचत खातेदाराला महिन्यातून तीनदा विनाशुल्क त्याच्या खात्यात पैसे भरता येतील. मात्र त्यांनतरच्या प्रत्येक भरण्यावर ५० रुपये शुल्क आणि सेवाकर भरावा लागेल. चालू खात्यासाठी हे शुल्क कमाल २० हजार रुपयांपर्यंत जाईल. दर महिन्याला खात्यात किमान शिल्लक ठेऊ न शकलेल्या खातेदारांना सेवाकर आणि १०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

महानगरांमध्ये किमान शिलकीपेक्षा ७५ टक्के कमी रक्कम राहिल्यास सेवाकर आणि १०० रुपये दंड आकारणी होईल. किमान शिलकीपेक्षा ५० टक्के रक्कम राहिल्यास हा दंड ५० रुपये असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 10:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close