देशात असहिष्णुतेला थारा नाही, गुरमेहर प्रकरणावर राष्ट्रपतींचे खडेबोल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2017 09:27 PM IST

देशात असहिष्णुतेला थारा नाही, गुरमेहर प्रकरणावर राष्ट्रपतींचे खडेबोल

pranav_mukharji402 फेब्रुवारी : दिल्लीमधल्या रामजस कॉलेजमधली हिंसक आंदोलनं आणि त्यावरून सुरू झालेल्या राष्ट्रवादाच्या चर्चेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी नाराजी व्यक्त केलीये. भारतात असहिष्णुतेला थारा नाही, असं म्हणत त्यांनी गुरमेहर कौरची बाजू घेतली. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या वादानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येही विद्यार्थी संघटनांमधला वाद उफाळून आला. पण या विद्यापीठांमध्ये अशांतता निर्माण करण्यापेक्षा विधायक बाबींवर चर्चा घडवून आणावी, असं राष्ट्रपतींनी म्हटलंय. केरळमधल्या कोचीमध्ये एका व्याख्यानात राष्ट्रपतींनी हे मत मांडलं.

घटनेने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलाय. त्यामुळे स्वतंत्र विचार आणि वक्तव्यांवर कुणी गदा आणू शकत नाही हेही राष्ट्रपतींनी म्हटलंय. राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद यावर नव्याने विचार करण्याची वेळ आलीय, असं सांगून सरकारसाठी भारताच्या नागरिकांनाच प्रथम प्राधान्य हवं, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.

दिल्लीतल्या रामजस कॉलेजमध्ये उमर खलिदला बोलवण्यावरून वाद झाला. उमर खलिद हा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. यावरून रामजस कॉलेजमध्ये हिंसक निदर्शनं झाली. त्यानंतर गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने अभाविपविरुद्ध फेसबुकवर एक पोस्ट टाकली. यावर सोशल मीडियावर राष्ट्रवादाबद्दल जोरदार चर्चा झाली. गुरमेहेरला देशद्रोही ठरवण्यात आलं.  किरेन रिजिजू आणि व्यंकय्या नायडू या मंत्र्यांनीही त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी राष्ट्रवाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वक्तव्य केलंय. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे, असं खडेबोल प्रणव मुखर्जींनी सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...