रेल्वेचं 'किचन' आता आयआरसीटीसीकडे, नवं धोरण जाहीर

रेल्वेचं 'किचन' आता आयआरसीटीसीकडे, नवं धोरण जाहीर

  • Share this:

railfood28 फेब्रुवारी : भारतीय रेल्वेने आज सर्व रेल्वे प्रवाशांना आनंदाची बातमी दिली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कॅटरिंग धोरणाची घोषणा रेल्वे मंत्रालयानं केली आहे. या नव्या धोरणांनुसार, रेल्वे विभागाच्या स्थानिक खानावळी (बेस किचन) मध्ये जेवण तयार केलं जाईल. तसंच आयआरसीटीसीच्या माध्यमातूनच रेल्वे प्रवाशांपर्यंत ते पोहोचवलं जाईल.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं की, या नव्या धोरणानुसार, आयआरसीटीसीकडे कॅटरिंग व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.

तर रेल्वेमध्ये खराब जेवण मिळण्याच्या प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन, रेल्वे प्रवांशांना जेवण पोहोचवण्याची जबाबदारी देखील आयआरसीटीसीचीच असेल.

तेव्हा रेल्वेमध्ये आता चविष्ठ जेवण उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी रेल्वेकडे असणार, असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे, या नव्या धोरणात रेल्वेमध्ये जेवण पोहोचवण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्याचं बंद करण्यात आलं आहे.

irctc44काय आहे नवं धोरण?

-रेल्वेमध्ये जेवण तयार केलं जाणार नाही

-ट्रेनच्या पँट्री कारमध्ये आता बेस किचनमध्ये बनवण्यात आलेलं जेवण गरम करण्याची व्यवस्था

-बेस किचनवर आयआरसीटीसीचं नियंत्रण

-पूर्वी जेवण कुठं तयार करायचं हे पूर्णपणे कंत्राटदारांच्या मर्जीवर

-फूड चेन कंपन्यांनाही जोडलं जाणार

-रेल्वेमध्ये जेवण पुरवण्यासाठी यापुढे लायसेन्स दिलं जाणार नाही

-जुन्या ट्रेनमध्ये जेवण पोहोचवण्याची खासगी कंत्राटदारांची मुदत

संपल्यानंतर त्याचीही जबाबदारी आयआरसीटीसीकडेच

- नव्या कॅटरिंग पॉलिसीमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठीही विशेष सवलत

-कॅटरिंगच्या कंत्राट वाटपात महिलांना तीन टक्के आरक्षण

-सर्व रेल्वे स्थानकांवर 33 टक्के स्टॉल्स हे महिलांसाठी राखीव

रेल्वेचे सर्व बेस किचन हे झोनल रेल्वेच्या अधिकाराखाली नियंत्रित

-रेल्वे पँट्रीकार सेवा पुरवण्याचं कामही आयआरसीटीसीकडं

-ए-1 आणि प्रथम श्रेणीतल्या रेल्वे स्टेशनवरील जन-आहार, फूड प्लाझा

आणि फूड कोर्टची जबाबदारीही आयआरसीटीसीकडेच

- कॅटरिंग सेवेत स्वयंसेवी महिला बचत गटांना  जोडण्याचे प्रयत्न सुरू

-स्थानकांवर दुधाचे स्टॉल्स असण्यावर विशेष भर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 28, 2017, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading