यूपीचं महाभारत - 'लखनऊ का नवाब कौन' ?

यूपीचं महाभारत - 'लखनऊ का नवाब कौन' ?

  • Share this:

up_electionकौस्तुभ फलटणकर,दिल्ली

27 फेब्रुवारी :  उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये 7 टप्प्यांमधले पाच टप्पे पूर्ण झालेत. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यांमध्ये निवडणूक रंगात आलीय. उत्तर प्रदेशात एक जुनी म्हण आहे. दिल्लीचा रस्ता लखनऊमार्गे जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात लखनऊला महत्त्व आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह इथूनच निवडून गेलेत. त्यामुळे लखनऊ कोण जिंकतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने 8 पैकी 7 जागा जिंकून आपणच लखनऊचे नवाब असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यामुळे समाजवादी पक्ष आणि भाजपसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा झालाय. याच मतदारसंघात दलित आणि मुस्लीम मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे बसपाच्या मायावतींनीही इथे जोर लावलाय.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत नोटबंदीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यासोबतच शिक्षण, विकास या मुद्द्यांवरही निवडणूक लढली जातेय. व्यापारासोबतच लखनऊकडे एज्युकेशन हब म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे इथले मतदार कुणाला कौल देणार यावर उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

यावेळी विधानसभा निवडणूक सोशल मीडियामध्येही लढवली जातेय. त्यामुळे भाजप आणि समाजवादी पक्षाने मोठमोठ्या वॉररूम्स उघडून त्याची जबाबदारी प्रोफेशनल लोकांवर सोपवली आहे. नेत्यांचा प्रचार, त्यांचे दौरे ही सगळी सूत्रं इथूनच हलवली जातायत.  लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरच्या प्रचारावर भर दिला होता. आता विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियामधून तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजप आणि समाजवादी पक्ष या दोघांचाही प्रयत्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 06:18 PM IST

ताज्या बातम्या