कानपूर अपघाताचा कट सीमेपलीकडे रचला,मोदींचा हल्लाबोल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2017 09:58 PM IST

कानपूर अपघाताचा कट सीमेपलीकडे रचला,मोदींचा हल्लाबोल

modi44424 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या गोंडा जिल्ह्यात आज प्रचारसभा घेतली. कानपूरमध्ये झालेला ट्रेन अपघात सीमेपलीकडे कटकारस्थान रचून घडवून आणला गेला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हा ट्रेन अपघात घडवण्याचं कारस्थान सीमेपलीकडे आणि नेपाळमध्ये रचलं गेलं, असं मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशातला गोंडा जिल्हा भारत आणि नेपाळच्या सीमेलगत आहे. कानपूर देहात जिल्ह्यात इंदोर - पाटणा एक्सप्रेसला गेल्या वर्षी 28 डिसेंबरला अपघात झाला होता. यामध्ये 150 जण मृत्युमुखी पडले होते. इंदोर-पाटणा एक्सप्रेसचे 14 डबे घसरल्याने हा अपघात झाला. हा अपघात नसून घातपात आहे, असं चौकशी अहवालात समोर आलं, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. गोंडा जिल्ह्यात असे घातपात घडवून आणले जात असतील तर या भागात जास्त दक्षता पाळण्याची गरज आहे, असं म्हणत मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे एकेक टप्पे जवळ येतायत तसतसा समाजवादी पक्ष आणि भाजपमधला संघर्ष तीव्र होत चाललाय. आतापर्यंत चार टप्प्यांतलं मतदान झालंय आणि आता 27 फेब्रुवारी, 4 मार्च, 8 मार्च यादिवशी उरलेल्या तीन टप्प्यांचं मतदान आहे. उत्तर प्रदेशातल्या या महाभारतात विजय कुणाचा होणार हे 11 मार्चला कळेल. उत्तर प्रदेशसोबतच पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांचा निकालही 11 मार्चला कळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 09:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...